HW News Marathi
महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्याचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ असे नामांतर करावे, होळकरांच्या वंशजांची मागणी

अहमदनगर | राज्यात शहरांची नावे बदलण्याचा विषय अनेक दिवसांपासून सुरुच आहे. औरंगाबादचे नामांतर हा विषय तर राजकीय वर्तृळात वादात सापाडला आहेच. हा विषय असतानाच आता अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी करणारे एक पत्र लिहत तशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यांनी पत्रात असे लिहिले आहे की, अहिल्यादेवींवर निष्ठा असणाऱ्या लोकभावनेचा सन्मान ठेवत अहमदनगर जिल्ह्याचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ असे नामांतर करावे, अशी विनंती या पत्रातून भूषणसिंह राजे होळकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

पुढे पत्रात त्यांनी असंही म्हटलं आहे की, ‘अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. देशाच्या प्रत्येक भौगोलिक स्थानावर त्यांनी अनेक मंदिरांची स्थापना केली. अशा या महान व प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे माहेर अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे आहे. महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या अहिल्यादेवींनी हिंदुस्थानाला नवी दिशा दिली. त्यामुळे या सगळ्याचा सन्मान ठेवत नामांतर करावे’, अशी विनंती पत्रातून करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी भूषणसिंह होळकर यांनी पवार कुटुंबीयांवर आरोपही केला होता. होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा असल्याचा आरोप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी केला आहे. आपण जर माहिती घेतली तर जेजुरी परिसरात हे लोकं प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे होळकरांच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहेत, हे दिसेल. त्यासाठी हा उद्योग सुरु आहे, असा गंभीर आरोप भूषणसिंह होळकर यांनी केला आहे.

संभाजीराजे छत्रपती जर जेजुरी मधील कार्यक्रमाला जाणारच असतील तर त्यांनी अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करावं. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते जर अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण झले तर आम्ही त्याचे स्वागतच करू, असे होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी म्हटलं आहे. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून भूषणसिंह होळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी महामंडळाचा ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव

News Desk

भाजपला आता ‘जय’ चालत नाहीत, जयसिंगराव गायकवाड यांच्या राजीनाम्यावरून मुंडेंची टोलेबाजी

News Desk

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोरोनाची लागण

News Desk