HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या मराठी प्रेमाविषयी प्रशनचिन्ह,बेळगांव निवडणुकीवर राऊतांनी खडसावलं !

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. पंढरपूर मंगळवेढा निवडणूकीची एकीकडे तयारी सुरू आहे तर दुसरीकडे बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत शुभम शेळके या उमेदवाराच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या दौऱ्यावर आणि भाजपलाही सुनावले आहे.

संजय राऊत म्हणाले की, “बेळगाव दौरा हा फक्त दौरा नव्हता, महाराष्ट्र एकीकरण समिती फार महत्त्वाची संघटना आहे आणि एकीकरण समितिचा उमेदवार शुभम शेळके हा लोकसभा लढवत आहे आणि त्याला पाठिंबा देणे हे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचे कर्तव्य आहे. इथे मतभेद असले तरी चालतील मात्र तिथे नसायला हवेत. शिवसेना काँग्रेस भाजप राष्ट्रवादी प्रत्येक मराठी माणसाने तिथे गेले पाहिजे, तिथे लोकांचा उत्स्फर्तपणे पाठिंबा मिळतोय, यावेळेस महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार चांगली मुसंडी मारतील”, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली त्याचं वाईट वाटलं नाही – संजय राऊत

“देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या वर टीका केल्याने मला वाईट वाटले नाही. मात्र ते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांच्या उपस्थितीत विधानसभेत बेळगाव-कारवार यांना पाठिंबा देण्याचे ठराव केलेले आहेत, पाठिंब्याची गरज होती त्या वेळी त्यांनी वेगळी भूमिका घेतली. आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं बेळगावात येऊन मराठी माणसाला पाठिंबा द्या, पण फडणवीस यांनी वेगळी भूमिका घेतली असेल तर महाराष्ट्रातली जनता त्याची नोंद ठेवते आहे”.

“आम्हाला मराठी प्रेमासाठी कोणी ज्ञानामृत पाजण्याची गरज नाही, आणि ज्या बेळगाव साठी 1967 साठी आंदोलन करून शिवसेनेने 67 हुतात्मे दिलेली आहेत, आणि बाळासाहेब ठाकरे यांना तीन वर्षाचा तुरुंगवास बेळगाव साठी भोगावा लागला, त्या शिवसेनेचे आम्ही पाईक आहोत, त्यामुळे आमचे मराठी प्रेम काय आहे हे आम्हाला इतरांकडून शिकण्याची गरज नाही, खरं म्हणजे तुमच्या मराठी प्रेमाविषयी या विषयाने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे”.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथ विधीवर देखील भाष्य करत म्हणाले की, “अजित पवार यांना चांगलं माहिती आहे सरकारला कसा टेकू लावायचा, ज्यावेळी पहाटे सरकार बनलं, दुपारी कोसळलं, त्यानंतर पुन्हा ते बनलं या ऑपरेशनचे अजित पवार सर्जन आहेत”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“दिल्लीत येण्याची माझी इच्छा नव्हती” नितीन गडकरींना सांगितला ‘तो’ किस्सा

News Desk

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये सुधारणा अक्रियाशील सदस्याची तरतूद रद्द

News Desk

“2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही”, निलेश राणेंचं प्रत्युत्तर

News Desk