HW News Marathi
Covid-19

‘सिल्व्हर ओक’नंतर पवारांच्या गोविंद बागेतही ‘कोरोना’चा शिरकाव, चौघांना लागण

मुंबई | मातोश्री, सिल्वर ओक आणि आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे बारामतीतील निवासस्थान असणाऱ्या गोविंद बागेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गोविंदबागेतील ४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदबागेतील या चौघांचे कोरोना रिपोर्ट हे आज (२१ ऑगस्ट) दुपारी पाॅझिटीव्ह आले आहेत. यात ३ पुरुष आणि १ महिलेचा समावेश आहे. दरम्यान, बारामतीत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४७४ वर पोहोचली आहे.

शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थान ‘सिल्व्हर ओक’वर काहीच दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. ‘सिल्व्हर ओक’ वरील तब्बल १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात सुरक्षा रक्षकांचा त्याचप्रमाणे अन्य कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. तर स्वतः शरद पवार आणि पवार कुटुंबियांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. मात्र, ‘सिल्व्हर ओक’नंतर आता पवारांच्या गोविंद बागेतही ‘कोरोना’चा शिरकाव झाला आहे. त्यामुळे, निश्चितच चिंता वाढली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुंबईत सध्या तरी लॉकडाउन लावण्याइतकी बिकट परिस्थिती नाही पण…”

News Desk

राज्य सरकारीची कार्यालय आणि कर्मचाऱ्यांसाठी नियमावली जाहीर

News Desk

“निलेश राणे लवकर बरे व्हा”, रोहित पवारांनी दिल्या सदिच्छा

swarit