HW News Marathi
Covid-19

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ‘कोरोना पॉझिटिव्ह’

मुंबई । राज्यात एकीकडे पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याचे शासन आणि प्रशासनाची चिंता वाढलेली असताना राज्यातून एक मोठी बातमी येत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेश टोपे यांनी आज (१८ फेब्रुवारी) स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल”, असे ट्विट राजेश टोपे यांनी केले आहे.

“माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी”, असे आवाहनही यावेळी राजेश टोपे यांनी यावेळी केले आहे. दरम्यान, आज सकाळीच राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. जयंत पाटील यांनी देखील ट्विट करत याबाबतची माहिती दिली आणि त्यानंतर राजेश टोपे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त येत आहे.

मंत्री जयंत पाटील अणि राजेश टोपे यांच्यासह भाजप खासदार रक्षा खडसे, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आजच समोर आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा पुन्हा एकदा शासन-प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार असून ही स्थिती नियंत्रणात आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांना सर्व नियम आणि निर्बंध पाळण्याचे आवाहन केले जात असून अनेक भागांत लॉकडाऊनबाबतचा निर्णयही घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिरम इन्स्टिट्यूटच्या मानवी चाचणी दरम्यान मेंदुरवर परिणाम झाल्याचा स्वयंसेवकाचा आरोप

News Desk

रुग्णसेवेचं अखंड व्रत घेवून अहोरात्र सेवा देणाऱ्या कोरोना योध्यांच्या रूपातील डॉक्टरांना राजेश टोपे यांचे पत्र

News Desk

‘उद्धवजी, देर आये दुरुस्त आये!’भाजप आमदाराची टिका ..

News Desk