HW News Marathi
महाराष्ट्र

“तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा?”, अमोल मिटकरींचा पडळकरांना अप्रत्यक्ष टोला

सांगली | गेले अनेक दिवस राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक वाद सुरुच आहे. आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. आता पुन्हा एकदा अमोल मिटकरी यांनी पडळकर यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

“तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? मला एक पत्रकार म्हणे बोला त्याच्यावर, मी म्हटलं, माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. समोर कॅमेरा असल्याने मी नाव न घेता बोलणार आहे”, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते मनोजबाबा शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांचे शिवचरित्र्य व्याख्यान म्हैसाळ येथे आयोजित केले होते. यावेळी मिटकरी यांनी भाजप, केंद्र सरकार आणि पडळकरांवार नाव न घेता सडकून टीका केली आहे.

“मी नागज फाट्यावर दारू विकली नाही किंवा कोणत्या आजीची दोन कोटींची जमीन बळकावली नाही. मी कुत्र्यांना भीत नाही”, असा घणाघात मिटकरी यांनी केला. “तुम्हाला काय वाटतं, हे सोपं असतं. एखादं श्वान बैलाच्या मागे भूंकतं. बैल एकदा, दोनदा ऐकतो, तिसऱ्यांदा मात्र लाथ मारतो. बैलाने लाथ मारल्यानंतर कुत्रा मागेच जातो”, असा टोला त्यांनी लगावला आहे.

“आम्हाला ज्यांनी आमदार केलं आहे ते आमचे गुरुही काही कमी नाहीत. विरोधासाठी विरोध नाही करायचा. शांत बसायचं. पण टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम वाजवायचा”, असं मिटकरी यावेळी म्हणाले आहेत.

“थांबा! वेट अॅण्ड वॉच. भलेभले संपले बेट्या. तू कोणत्या गल्लीचा खसखस आहेस राजा. त्याच्यामुळे बोलताना सुद्धा नीट आणि सांभाळून बोललं पाहिजे”, असंदेखील ते म्हणाले. यावेळी मिटकरी यांनी तरुणांना १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, यावर आता गोपीचंद पडळकर काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचा दणका! नागपूर विधान परिषदेत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय

News Desk

मन हेलावणारी पोलीस भरती

News Desk

राज ठाकरेंचा मोर्चा आता वळणार मराठवाड्याकडे!

News Desk