HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस म्हणतात, “मुख्यमंत्री महोदय तुमच्या मंत्र्यांना आवरा”

मुंबई | महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्यात लॉकडाऊनची वेळ आल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सर्वपक्षीय बैठकीत दिले. कोरोनाच्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीचं ऑनलाईन आयोजन केलं होतं. या बैठकीला भाजपचे नेतेही उपस्थित होते, यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा समावेश होता. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक इशारा दिला.

मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मंत्र्यांना आवरा असं, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना असं म्हटलं आहे. हा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी का दिला? याची चर्चा मात्र आता राजकीय वर्तृळात सुरु झाली आहे. पूर्ण लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना आवरावं, सतत केंद्राकडे बोट दाखवाल, तर आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करु नका, असं ते म्हणाले आहेत.

सध्या कोरोना लसीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरु आहे. कोरोना लसीच्या वाटपात केंद्रातील भाजप सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून सातत्याने केला जात आहे, यामुळे भाजपची प्रतिमा खराब होत असल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे आज देवेंद्र फडणवीसांनी भर बैठकीत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत राज्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्री घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचं जाहीर करुन अजित पवार यांनी देखील त्यांच्या निर्णायाला पाठिंबा दिला आहे, मात्र दुसरीकडे लॉकडाऊनला थेट पाठिंबा देणं देवेंद्र फडणवीस यांनी टाळल्याचं दिसत आहे. लॉकडाऊन केल्यास लोकांचा उद्रेक होईल, असं मत त्यांनी मांडलं आहे.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राजकीय, धार्मिक अशा कोणत्याही सभा आयोजित करायच्या नाही असं सांगितले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढात होणाऱ्या पोटनिवडणूकीसाठी तिथे सभा घेतला होत्या. त्यावरुन फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे का अशीही चर्चा सध्या सुरु झाली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुला- मुलींच्या सम-विषम वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांची निर्दोष मुक्तता

News Desk

माझी पत्नी आरएसएसमध्ये कधी गेली ?

News Desk

माजी गृहमंत्र्यांकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून जी वसुली केली त्याची परमबीर सिंग यांनी कबुली द्यावी, राष्ट्रवादीची मागणी  

News Desk