HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाचा मोर्चा थेट हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर धडकणार

 

पुणे | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात गोंधळ सुरुच आहे. मराठा समाजाने आक्रमक पवित्रा हाती घेतला आहेच. दरम्यान, याच मुद्यावर मराठा समाजाने ८ डिसेंबरला घोषित केलेल्या मोर्चाची तारीख बदलली आहे. आता विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. याप्रमाणे आता राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चासाठी आंदोलक १४ डिसेंबरला मुंबईत दाखल होणार आहे. यावेळी राज्य सरकारकडे तातडीने मराठा आरक्षणावर मार्ग काढण्याची मागणी केली जाणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील या मराठा वाहन मोर्चासाठी राज्यभरातून हजारो वाहनं मुंबईत दाखल होणार आहे. हा विराट वाहन मोर्चा थेट विधीमंडळावर धडकेल. आधी हा मोर्चा ८ डिसेंबरला निघणार होता. मात्र, मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आक्रमक शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा केल्याने मराठा मोर्चा पुढे ढकलण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, SEBC आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीबाबत ५ सदस्यीय घटनापीठासमोर ९ डिसेंबरला दुपारी २ वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी राज्य सरकारकडून पाच वकिलांची फौज तयार करण्यात आली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विटरव र५ वकिलांची ही समन्वय समिती जाहीर केली आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, “एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात 5 सदस्यीय घटनापीठासमोर होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर करण्यात येत आहे. या समन्वय समितीमध्ये अ‍ॅड. आशिष गायकवाड, अ‍ॅड. राजेश टेकाळे, अ‍ॅड. रमेश दुबे पाटील, अ‍ॅड. अनिल गोळेगावकर आणि अ‍ॅड. अभिजीत पाटील यांचा समावेश आहे.”

“येत्या 9 डिसेंबरला होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक आणि संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा”, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केलं आहे. त्याचबरोबर “पाच वकिलांची समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून राज्य सरकारच्या वकिलांना माहिती देईल”, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार

News Desk

‘राष्ट्रवादीने धनंजय मुंडें आणि अमोल कोल्हेंना प्रदेशाध्यक्ष का केलं नाही’, पडळकरांचा सवाल

News Desk

पवारांविरोधातील कारवाईवरून राहुल गांधींची सरकारवर टीका

News Desk