HW News Marathi
महाराष्ट्र

“संजय राठोडांचं नेतृत्व संपवण्याचं कटकारस्थान”, भाजप सरपंचाने दिला राजीनामा

बीड | पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. २२ वर्षीय तरूणीचं कथित मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाल्याचा आरोप भाजपानेकेला आहे, शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट नाव घेऊन भाजपनं हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाच्या अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत.

तर दुसरीकडे या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप होत असताना त्यांच्या समर्थनार्थही अनेकजण पुढे येत आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या काळवटी तांडा येथील सरपंच यांनी भाजपावर गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला आहे. सरपंच कमल नाथराव चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवून संजय राठोड यांचे समर्थन केले आहे.

या पत्रात लिहिले की, मी कमल नाथराव चव्हाण काळवटी, ता. अंबाजोगाई, जि. बीड येथील सरपंच म्हणून मी माझ्या भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा देत असून त्याचा स्वीकार करण्यात यावा. राजीनाम्याचं कारण म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपा पक्षामधील नेते वेळोवेळी महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्व व बंजारा समाजातील उच्च पदस्थ लोकनेते संजय राठोड यांना संपविण्याचे कटकारस्थान करत असल्याचं मला जाणवत आहे असा गंभीर आरोप करत कमल चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधी सुसाईड नोट, आता सीडीआरमध्ये पुरावे, पोलीस कसून तपास करणार, महंत नरेंद्र गिरींच्या आत्महत्येचं गूढ उकलणार?

News Desk

विधानसभेत नामांतराचे तीन प्रस्ताव मंजूर; दोन जिल्हे आणि एका विमानतळाचे नाव बदलले

Aprna

“भोंगेधारी आणि पुंगीधारी फार पाहिले”, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

Aprna