HW News Marathi
महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात २ जण पोलीसांच्या ताब्यात

पुणे | पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अखेर दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांची कसून चौकशी करण्यात येणार असून यांची पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात काय भूमिका आहे? याचा तपास पोलीस करणार आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी ११ दिवसानंतर पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतलं आहे. पण हे दोघे कथित व्हायरल क्लिपमधील विलास आणि अरुण राठोड आहेत का? हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. आम्हाला ज्यांच्या ज्यांच्यावर संशय आहे, अशा लोकांचा आम्ही तपास करू शकतो, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेले नेमके कोण आहेत? याचं कुतुहूल वाढलं आहे.

मुळची परळीची असलेली २२ वर्षाची पूजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री दीड वाजता तिनं सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पूजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पूजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

कोण आहे अरुण राठोड?

पूजा आत्महत्या प्रकरणात नाव आलेला अरुण राठोड हा वनमंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता आहे. तो संजय राठोड यांच्या अत्यंत जवळचा असून राठोड यांच्या सर्व खासगी गोष्टी अरुणला माहीत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. संजय राठोड यांच्या घरी, कार्यालयात आणि मंत्रालयातही अरुणचा मुक्त संचार असल्याने तो मंत्र्याचा किती जवळचा आहे

परळीचा रहिवासी

अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या दारावती तांडा येथील रहिवासी आहे. तो पुण्यात पूजा सोबत राहत होता. पूजाला काय हवं नको ते देण्याचं काम त्याच्याकडे होतं असं सूत्रांनी सांगितलं. पूजाच्या राहण्याची व्यवस्था मंत्रिमहोदयांनी अरुण राठोड याच्याकडे सोपवली होती. अरुण राठोड आणि पूजा चव्हाण याचे कोणतेही रिलेशन नाही. ते नातेवाईक नसल्याचे बोलले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुकांचे अंदाज बांधने बंद करा – राज्यमंत्री बच्चु कडू

News Desk

राज्यातल्या दुर्घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांची महत्त्वपूर्ण माहिती…!

News Desk

खडसेंनी नैतिकतेच्या गोष्टी करु नयेत – प्रवीण दरेकर

News Desk