मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. ”दुसऱ्या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. पण त्यावेळी शिवसेनेनं निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानं आपले लोक भाजपमध्ये गेले, नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती. आरएसएस स्वातंत्र्य संग्रामात कुठेही नव्हती. पण भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल”, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना शिवसेनेची पुढील ध्येय धोरणे सांगितली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात भाजपवर टीकास्त्र सोडले. रामाच्या नावानं काही लोक घरोघरी पोहोचत आहेत, पण ते पैसे मागण्यासाठी पोहोचत आहेत, आपल्याला तसं करायचं नाहीये, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलं आहे.
आता भाजपवाले पैसे गोळ्या करण्यासाठी रस्त्यावर आलेत – उद्धव ठाकरे
“देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो,” माझ्यापर्यंत तळागाळातला माणूस हा तुमच्यामार्फत माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. ‘बाबरी मशिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती, आता भाजप पैसे गोळ्या करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत.
पाकिस्तानमध्ये भगवा फडकावा, आम्हाला आनंद होईल – उद्धव ठाकरे
नेपाळ आणि श्रीलंकेत सत्ता स्थापन करणार असं म्हणतात. हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा, मग आम्ही तुमचं स्वागत करू, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. पाकिस्तानमध्ये भगवा फडकावा, आम्हाला आनंद होईल, असंही उद्धव ठाकरे भाजपला उद्देशून म्हणालेत.
तीन दिवस मॅरेथॉन बैठका
दरम्यान, शिवसेनेच्या मोठ्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीतील सर्व आमदारांशीही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची बैठक आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली होती. याबाबत पहिली बैठक आज संध्याकाळी पार पडणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.