HW News Marathi
महाराष्ट्र

आता फडणवीस अन् राणे दोघेही जोड्याने मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघतील !

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरुन डिवचले आहे. “देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे दोघेही आता जोड्याने मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पाहत असतील”, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. नवाब मलिक हे आज (१६ फेब्रुवारी) परभणीत माध्यमांशी बोलत होते.

नवाब मलिक यावेळी बोलताना म्हणाले की, “गेल्या २२ वर्षांपासून नारायण राणे मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पाहत आहेत. मात्र, आता राणेंना देवेंद्र फडणवीस जोडीदार भेटले आहेत. त्यामुळे, फडणवीस आणि राणे हे दोघेही आता जोड्याने मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहत बसतील”, असे मलिक म्हणाले. दरम्यान, महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच भाजपकडून “हे सरकार लवकरच पडणार” असे सांगत वारंवार टीका करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतेच “आम्ही भविष्यात फासे पलटवू” असे विधान केले होते. त्यावरही टीका करताना नवाब मलिक म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी ज्योतिष विद्या कुठून शिकली हे आम्हाला माहिती नाही. पण आमचा ज्योतिष विद्येवर विश्वास नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो आणि वरुण सरदेसाईंना फोन करतो”, नितेश राणेंचा गंभीर आरोप

News Desk

करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर, तब्बल 16 दिवसांनी तुरुंगाबाहेर!

News Desk

महाराष्ट्राबद्दलच्या आकसातून मोदी सरकारने आणखी एक संस्था दिल्लीला हलवली! – सचिन सांवत

News Desk