HW News Marathi
महाराष्ट्र

आपण ह्या महाराष्ट्राचे नेतृत्व करावं ह्याच सदिच्छा ! सत्यजित तांबेंकडून जयंत पाटलांना खास शुभेच्छा 

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा आज (१६ फेब्रुवारी) जन्मदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर, सर्वपक्षीय नेत्यांनी जयंत पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या सर्व शुभेच्छांमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिलेल्या शुभेच्छा खास ठरल्या आहेत. सत्यजित तांबे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात कि, “काका, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! एक दिवस आपण ह्या महाराष्ट्राचे नेतृत्व करावं ह्याच सदिच्छा.” दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे वक्तव्य केले होते. त्यानंतर, काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांनी दिलेल्या शुभेच्छा विशेष ठरत आहेत.

जयंत पाटील मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हणाले होते ?

“आमच्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद सध्या नाही. प्रत्येक राजकारण्याला जशी इच्छा असते तशी माझीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. पण पक्ष आणि शरद पवार जो निर्णय घेईल तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इतका काळ काम करणाऱ्या माझ्यासारख्या नेत्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझी मतदारी आहे. यासाठी संख्या वाढली पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे. ती संख्या जर वाढली आणि मोठा पक्ष झाला तर मग शरद पवार जो निर्णय देतील तो मान्य असेल”, असे जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट म्हटले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिले होते.

 

विधानानंतर काय दिले होते स्पष्टीकरण ?

आपल्या विधानावर स्वत: जयंत पाटील यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले होते. इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला मी दिलेल्या मुलाखतीचे जसेच्या तसे वार्तांकन लोकमतमध्ये आलेले असून, माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये हि विनंती, असे ट्विट जयंत पाटील यांनी केले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘प्रधानमंत्री कौशल केंद्रा’चे उद्घाटन  

News Desk

शेतकऱ्यांना नादुरुस्त रोहित्रे तात्काळ बदलून द्या – नितीन राऊत

News Desk

राणीच्या बागेमध्ये परदेशातून दुर्मिळ प्राणी आणण्याच्या निविदेत १०६ कोटींचा भ्रष्टाचार; आमदार मिहीर कोटेचा आरोप

Aprna