HW News Marathi
महाराष्ट्र

आमच्या नेत्याचं शिक्षण काढू नका, आमच्या वाटेला जाऊ नका, राणे समर्थकांचा विनायक राऊत यांना इशारा

रत्नागिरी | भाजप खासदार नारायण राणे यांना टोला लगावलेल्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांना राणे समर्थकांनी इशारा दिला आहे. आमच्या नेत्याचं शिक्षण काढू नका, आमच्या वाटेला जाल तर याद राखा, अशा शब्दात राणे समर्थकांना विनायक राऊतांना इशारा दिला आहे. ‘मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल, अशी बोचरी टीका विनायक राऊतांनी केली होती. त्यावरुन राणे समर्थकांनी विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आहे.

खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल. बुडत्याला काडीचा आधार. अशा शब्दात राऊतांनी राणेंना टोला हाणला होता. यावरुन राणे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी विनायक राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. इतकच नाही तर आमच्या वाटेला जाल तर याद राखा, असा इशाराही भाजप कार्यकर्त्यांनी विनायक राऊत यांना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूर्वीच्या सरकारने विदर्भाची उपेक्षाच केली !

News Desk

राज ठाकरेंचा इशारा, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल !

News Desk

राणेंना दणका, सिंधुदुर्गातील 2 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

News Desk