HW News Marathi
महाराष्ट्र

अतुल भातखळकरांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आवाज उठवल्याने आले धमकीचे फोन  

मुंबई | परळीतील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरूणीने पुण्यात आत्महत्या केली, रविवारी मध्यरात्री या तरूणीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती, मात्र या तरूणीच्या आत्महत्येमागे ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याचा आरोप भाजपाच्या महिला आघाडीने केला होता, त्यानंतर चित्रा वाघ यांनी थेट शिवसेना मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला होता.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं. त्यानंतर आता अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर आणखी एक गंभीर आरोप लावला आहे. भातखळकरांनी ट्विट करून म्हटलंय की, पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे रविवारपासून मला धमक्यांचे फोन येत आहेत, ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे असा आरोप त्यांनी केला होता.

तसेच धमक्यांनी बंधणारा मी नाही, हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावं असा इशारा भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं, या पत्रात म्हटलं होतं की, शिवसेना पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील आमदार व आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नेत्याचे या प्रकरणी नाव पुढे आले आहे, या मंत्र्याचे आणि आत्महत्या करणाऱ्या तरूणीचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा सोशल मीडियात चर्चेत आहे. या संदर्भातील ऑडिओ क्लिप आणि फोटो व्हायरल झाले आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी मुख्यमत्र्यांना केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…म्हणजे मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का?” फडणवीसांचा सवाल

News Desk

आजपासून 9 मेपर्यंत औरंगबादमध्ये जमावबंदी लागू, पोलिसांचे आदेश

Aprna

जलयुक्त शिवारची एसआयटी मार्फत  चौकशी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

News Desk