HW News Marathi
महाराष्ट्र

१५ दिवसात आणखी दोन मंत्र्यांचे राजीनामे होणारच!   

मुंबई | मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात अटक आरोपी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्राने राजकारणात खळबळ उडाली आहे. या पत्रात शिवसेना नेते, राज्य मंत्री अनिल परब यांचा उल्लेख आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. याप्रकरणावरून भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर तीव्र शब्दात टीका करत सरकारमधील आणखी दोन मंत्र्यांचा येत्या पंधरा दिवसात राजीनामा होणार असा दावा केला आहे.

यावर बोलताना पाटील म्हणाले, चला मी आज नवीन घोषणा करतो की, १५ दिवसात आणखी दोन मंत्र्यांचे राजीनामे होणार आहेत. छापा. मग ते झाल्यानंतर पुन्हा म्हणा, की यांना कसे कळले, हे अमित भाईंशी बोलतात का? एनआयएशी बोलतात का? सगळ्या प्रकारच्या माहित्या यांना कशा मिळतात? असो हा कॉमन मॅनचा अंदाज आहे की अजून दोन मंत्र्यांचे राजीनामे होतील. असेही पाटील म्हणाले.

”मनसुख हिरेन आत्महत्या किंवा काही हत्येचा विषय निघाल्यानंतर वाझेंना तुम्ही निलंबित करावे अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी लावून धरली. सस्पेंडवरून आम्ही लॉंग लिव्हवर आलो, लॉंग लिव्हवरून आम्ही पदावरून दूर करापर्यंत आलो, नऊ वेळा विधानसभा स्थगित करावी लागली. म्हणजे केवढे प्रेम तुमचे वाझेंवर प्रचंड. एक मिनिट विधानसभेचे काम ठप्प होणे म्हणजे काही करोड काही लाख रुपयांचे नुकसान.

अख्खा दिवस सदन चालले नाही. त्यादिवशी मात्र गृहमंत्र्यांनी घोषणा न करता संसदीय कामकाज मंत्री अनिल परबांनी घोषणा केली. अनिल परबांचे म्हणणे आहे की, एका मंत्र्याचे नाव येणार आहे तुम्हाला कसे कळले वैगरे वैगरे, त्याची सुरूवात तिथे आहे की दुसऱ्या दिवशी नऊ वेळा सभागृह स्थगित झाले, दिवसभरासाठी सभागृह स्थगित झाले.

तरी काही तुम्ही केले नाही इतके वाझे तुमचे प्रिय, त्या वाझेंवर तुमचा अविश्वास इतका की म्हणे त्या वाझेंशी माझी भेट झाली. गिरणी कामगाराचं पोरगं आम्ही इथे गिरण भागामध्ये आमचं घर, तर एनआयएच्या कोठडीत जाऊन मी सचिन वाझेची भेट घेतली. आणि त्यांना असे म्हटले की, परबांचे नाव लिहा, आणि त्यांना असे म्हटले की, पवारांचे नाव लिहा. असे मी म्हटले का? हे हास्यास्पद आहे.” अशी खरमरीत टीका त्यांनी मविआ सरकारवर केला.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, आठवीत असणाऱ्या विद्यार्थाला सध्या परीक्षा नाही, त्यामुळे त्याला वेळ आहे. अशा आठवीला असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला की, पवार साहेबांनी सुद्धा अनिल परब हे गृह खात्यामध्ये लुडबुड करतात याबद्दल नापसंती व्यक्त केली. पवार साहेबांची आणि माझी काही भेट झालेली नाही. पण तुम्ही माध्यामातून छापले की, पवारांनी नापसंती व्यक्त केली, अनिल देशमुखांनी नापसंती व्यक्त केली, अनिल देशमुखांनी पवारांना तक्रार केली. मग अनिल परबांची गृहखात्यामधील लुडबुड ती पुन्हा एकदा सभागृहात दिसली. कारण सभागृहात अनिल देशमुख उपस्थित होते, तरी सुद्धा वाझेचे सस्पेंन्शन नाही, लॉंग लिव्हपण नाही, त्याचा चार्ज काढून घेण्याची गोष्ट अनिल परबांनी केली.

आता वाझेपण वाईट आणि परमबीर सिंगही वाईट. त्यामुळे काल परब साहेबांनी आणि आज माझे परम…परम… परम.. मित्र हसन मुश्रीफ, ज्य़ांना दिवसातून एकदा माझ्यासोबत बोल्ल्याशिवाय झोप लागत नाही, त्यांनी आयबीएनला म्हटले की, चंद्रकांत पाटलांना आठ दिवस आधी कसे कळले? जसे काय वाझे आणि मी रोज भेटतोच आहोत. भेटायला जाईन तर तुम्हालाही घेऊन जातो. भेटायलाच घेऊन जातो बाकी कशाला घेऊन जात नाही. तर असे खुळ्यासारखे, लहान मुलांसारखे प्रश्न यांच्या मनात निर्माण होतात की चंद्रकांत पाटलांना आधी कसे कळले. असाही आरोप पाटील यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि कार्यकर्त्यांना लोकल प्रवास पडला महागात, कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

News Desk

एसटीच्या तिकीट दरात १८ टक्के वाढ

News Desk

मांसविक्रीवर बंदी तर या व्यवसायातील लोकांना आदित्यनाथांकडून दूधविक्रीचा सल्ला!

News Desk