HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्रालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले ध्वजारोहण!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (१५ ऑगस्ट) मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोविड योद्धे, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय सहाय्यक तसेच कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना भेटून त्यांचे कोतुक केले. तसेच, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ माता यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

दरम्यान, आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले होते. त्यावेळेस पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. मुख्यमंत्री हे पद हाती घेतल्यानंतर पहिल्यांदा स्वातंत्र्यदिनी उद्धव ठाकरे यांनी ध्वजारोहण केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक !

News Desk

#Coronavirus : नायर रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह महिलेने केली आत्महत्या

News Desk

जयंत पाटील हे अनिल देशमुखांच्या घरचे वॉचमन आहेत का?, निलेश राणेंची घणाघाती टीका

News Desk