HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी केले ध्वजारोहण 

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. आज (१५ ऑगस्ट) मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी आज प्रथमच त्यांनी झेंडा फडकवला.

“महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे”, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (१४ ऑगस्ट) आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्यातील राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. “तुम्ही महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे”, असेही मुख्यमंत्री काल म्हणाले होते.

“महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलिसांचे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी सर्वांना सलाम, आणि जाहीर पुरस्कारासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ५८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. यात उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या सर्वांचेच कौतुक केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी गँगस्टर होतो मग मंत्री कसे केले?”, राणेंचा शिवसेनेला सवाल

News Desk

योगी सरकारच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर आल्या ८,५०० सूचना!

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ६ दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा यंत्रणांना यश

Aprna