HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपालांनी भाजप कार्यकर्त्यासारखे वागत पदाचा सन्मान ठेवला नाही – बच्चू कडू

नागपूर | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा विमान प्रवास राज्य सरकारने नाकारल्याने भाजप आक्रमक झालेली पाहायला मिळाली. यावरुन आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यपालांवरच टीका केली आहे. राज्यपाल गेल्या वर्षभरात भाजपच्या कार्यकर्त्यासारखे वागले, त्यांनीच राज्यपालाच्या पदाचा सन्मान ठेवला नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. राज्यपालांना सरकारी विमानप्रवास नाकारणे हा केवळ तांत्रिक मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्य सरकारच्या विमानाने प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आली. यावरुन मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या कृतीचे समर्थन करत राज्यपालांवर टीकेची तोफ डागली. तसेच विनाअनुदानित शाळांची ग्रँट वाढवण्याचा निर्णयही यावेळी बच्चू कडू यांनी जाहीर केला. ज्या शाळांना सध्या ० ते २० टक्के इतकी ग्रँट मिळत आहे त्यांची ग्रँट लवकरच २० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढवली जाईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. तसेच, राज्यात अतिरिक्त शुल्क घेणाऱ्या सीबीएसई शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद शमताना दिसत नाही. ठराविक दिवसांनी सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांना विमानातून उतरावे लागले. त्यानंतर राज्यपाल खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजीराजे, उद्धव ठाकरे व अशोक चव्हाण यांची मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईत बैठक

News Desk

विकास कामांचा बोलाचा भात बोलाची कढी! – भालचंद्र शिरसाट

Aprna

“देवेंद्रजी तुम्हाला परत यावचं लागेल पण अजितदादा तुम्ही पण परत या”, भाजपकडून सभागृहात खुली ऑफर

News Desk