HW News Marathi
महाराष्ट्र

आजोबा- नातूमधील वाद संवादात आम्ही काय बोलावं… हा त्यांचा घरचा प्रश्न आहे – फडणवीस

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन फटकारले आहे. काल (१२ ऑगस्ट)  “माझा नातू अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही”, अशा शब्दांत पवारांनी पार्थला फटकारलं. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. आणि आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. यावर प्रतिक्रिया देताना हा त्यांचा कौटुंबिक विषय असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. शिवाय, शरद पवार यांनी सीबीआय चौकशीबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली असल्याचेही ते म्हणाले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“आता आजोबा आणि नातूमधील वाद, संवाद, विवाद जे काही असेल त्यात आम्ही काय बोलावं…हा त्यांच्या घरचा प्रश्न आहे. आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे किंवा नातवाने आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवाने ठरवायचं आहे. त्यासंदर्भात मी बोलणं योग्य ठरणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “पण एक नक्की आहे की, त्यांनी सीबीआय चौकशी करायला माझी हरकत नाही असं सांगितलं आहे. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…आणि पुन्हा एकदा जयंत पाटील ऑन ग्राऊंड झिरो

swarit

पुणे मेट्रोवरुन भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई !

News Desk

दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार मुहूर्ताची वाट का बघत आहे ?

Gauri Tilekar