HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार दुखावले नाहीत, पवार कुटुंबियांमध्ये अजिबात वाद नाही – जयंत पाटील

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काल (१२ ऑगस्ट) बैठक झाली. दरम्यान, काल शरद पवार यांनी नातू पार्थ पवार याला फटकरल्यानंतर ही बैठक झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले. मात्र, ही बैठक आधीच ठरली होती, अशी माहिती जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

“शरद पवार यांच्यासोबतची बैठक कालच ठरली होती. वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पवारांनी बोलावले होते. अजित पवार दुखावलेले नाहीत. तसेच, पार्थ पवारांबाबत चर्चा झाली नाही”, असे बैठक संपल्यानंतर जयंत पाटील म्हणाले. “पार्थ पवार यांनी काही मते मांडली असतील, तर मतं मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण ते काय बोलले हे मी वाचलेलं नाही. पार्थ पवारांकडून स्पष्टीकरण मागवणार नाही. पवार कुटुंबियांमध्ये तसंच पक्षात अजिबात वाद नाही”,अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

दरम्यान, “अजित पवार बैठक सोडून निघून गेले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने ते निघाले”, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं. सुशांतसिंग राजपूतप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका आधीच स्पष्ट केली आहे, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे.

एकीकडे अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांची पाठराखण महाविकास आघाडी सरकारने चालविलेली असताना पार्थ पवार यांनी मात्र या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. तशा मागणीचे पत्र त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सीबीआय चौकशीबाबत काय तो निर्णय घेतला जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, पार्थ यांच्या या मागणीवर शरद पवार काय बोलतील याबाबत उत्सुकता होती. अखेर काल (१२ ऑगस्ट) पवारांनी मौन सोडले. ‘पार्थ अपरिपक्व आहे, त्याच्या मताला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही’ असे सांगत त्यांनी पार्थ यांना चांगलेच फटकारले.

आजोबांच्या या प्रतिक्रियेवर पार्थ काहीही बोललेले नाहीत. “मला त्यावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही”, असं त्यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांचीही प्रतिक्रिया आलेली नाही शरद पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर नातवाला फटकारल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी पार्थ पवार यांची लंबी रेस का घोडा हैं अस म्हणत पाठराखण केली. त्यामुळे राजकीय वातावरणात याविषयावर विविध चर्चांना उधाण आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डबेवाल्यांसारख्या परोपकारी लोकांमुळेच समाज जिवंत राहतो – राज्यपाल

News Desk

आदित्य ठाकरेंना हजार रुपये पाठवा | धनंजय मुंडे

swarit

‘नुसती बोलाची कढी आणि बोलाचा भात’, केशव उपाध्येंचा राज्यसरकारला टोला

News Desk