HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात पहाटेची ॲापरेशन फसल्यानंतर सप्टेंबर महिन्यात ॲापरेशन कमळचा मुहुर्त भोंदू डाॅक्टरांनी दिलाय !

मुंबई | देशात ऑपरेशन कमळ काही ठिकाणी सफल झाले तर काही ठिकाणी असफल झाले. यावरूनच आजच्या (१२ ऑगस्ट) सामना अग्रलेखातून ऑपरेशन कमळचा चांगलाच समाचार घेतला आहे. राजस्थानात फसलेले ऑपरेशन कमळ कसे भाजपच्याच अंगलट आले, याबद्दल सामनातून टीका करण्यात आली आहे. ही राजकिय विकृती असल्याचे सामना अग्रलेखात लिहिले आहे. महाराष्ट्रातही पहाटेची ऑपरेशन फसली. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भाजपच्या भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. अशी सडकून टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. तसेच थोडे थांबा, आणि पुढे जा… वळणावर धोका आहे असा सबूरीचा सल्लाही करण्यात आला आहे.

सामना अग्रलेख –

‘राजस्थानात ‘ऑपरेशन कमळ’ फसले. हा राजकीय विकृतीचा पराभव असल्याचे आम्ही मानतो. ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’प्रमाणे ‘ऑपरेशन कमळ’ची दहशत निर्माण केलीच होती. ‘‘सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा’’ या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर ‘ऑपरेशन कमल हो जायेगा’ या भीतीचे सावट निर्माण करायचे. मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करून भाजपला धडा दिला. काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहेच!’

काँग्रेसने राजस्थानमधील सरकार वाचविण्यात यश मिळवले आहे. बंडखोर नेते सचिन पायलट यांनी दिल्लीत येऊन प्रियंका-राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पायलट यांनी माघार घेतली. काँग्रेस हितासाठी आपण यापुढेही काम करत राहू, असे पायलट यांनी स्पष्ट केले. शुक्रवारपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे व मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडे सरकार चालविण्यासाठी स्पष्ट बहुमत आहे. या महिनाभराच्या घोडेबाजारात हसे झाले आहे ते भारतीय जनता पक्षाचे. आपल्या विचारांची नसलेली राज्या-राज्यांतील सरकारे आम्ही चालू देणार नाही किंवा सरळ पाडू हे त्यांचे धोरण आहे, पण राजकीय घमेंडीत त्यांचा सौदा चुकतो व शेअर बाजार गडगडतो. सचिन पायलट यांचे बंड यशस्वी झाले नाही. कारण पहिल्या झटक्यात ते आमदारांचा मोठा आकडा जमवू शकले नाहीत व अशोक गेहलोत यांची खिंड भाजप भेदू शकला नाही.

सत्ता व दबावाचे सर्व मार्ग अवलंबून अशोक गेहलोत यांनी राजस्थानच्या भूमीवर सरकार पाडणाऱ्यांना मात दिली. सरकार पाडण्यासाठी जे हातखंडे एरवी भाजप वापरतो, तेच ‘उपाय’ वापरून गेहलोत यांनी भाजपचा घोडेबाजार उधळला व सचिन पायलट यांचे बंड यशस्वी होऊ दिले नाही. आता राहिलेले काम दिल्लीत प्रियंका व राहुल गांधी यांनी केले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात जे घडवता आले ते भाजपला राजस्थानच्या युद्धभूमीवर करता आले नाही. गेहलोत यांच्या तुलनेत पायलट हे कमालीचे कच्चे खेळाडू निघाले. म्हणजे महाराष्ट्रात पहाटेचा शपथविधी उरकूनहीजी फसगत झालीच प्रकार सचिन पायलट यांच्याबाबत झाला.

पैसा व तपास यंत्रणा हाती असल्यावर प्रत्येक वेळी सरकारे पाडता येतातच असे नाही. मुळात विरोधी पक्षांची सरकारे चालूच द्यायची नाहीत हा अट्टहास लोकशाहीत का बाळगावा? महाराष्ट्रातले सरकार सप्टेंबरपर्यंत पाडूच पाडू असे आता भाजपातील उपऱया नेत्यांनी छातीठोकपणे सांगितले. राजस्थानात काम फसफसले तेव्हा आता महाराष्ट्रात पाडापाडीचे काम सुरू करायचे हे कसले धोरण? महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे व पाडण्याचे प्रयत्न सुरू असतील तर ते त्यांनी खुशाल करावेत, पण त्यासाठी उगाच तोंडाच्या वाफा का दवडता?

भाजपवाल्यांना तर झारखंडचे सरकारही पाडायचे आहे, पण त्यांना ते अजून तरी जमलेले नाही. राष्ट्रापुढील सर्व प्रश्न जणू संपले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यात मन रमवण्याचे उद्योग सुरू आहेत. देशावर आर्थिक व बेरोजगारीचे भयंकर संकट कोसळले आहे. त्यावर कोणी ठोसपणे बोलायला तयार नाही. कोरोनाच्या संकटाने लोकांचे जीवन संकटात आले व मृत्यूचा वेग वाढतो आहे. तेसुद्धा राज्यकर्त्यांच्या खिजगणतीत नाही. उद्योग-व्यवसाय पूर्ण कोलमडून पडला आहे. तो सावरण्याऐवजी हे लोक विरोधकांची सरकारे पाडायला निघाले आहेत. महाराष्ट्र असो की राजस्थान, पश्चिम बंगाल असो की झारखंड, तेथे फालतू बखेडे निर्माण करायचे व अस्थिरता निर्माण करायची हे राजकीय मनोरुग्णतेचे लक्षण नव्हे काय? जणू काही भाजपच्या अमलाखालील राज्य सरकारेच काय ती ठीकठाक सुरू आहेत. खरे म्हणजे

सगळ्यात जास्त गोंधळ व अराजकnत्यांच्याच राज्यांत आहे. बाजूच्या कर्नाटक राज्यातील स्थिती कोरोनामुळे नियंत्रणाबाहेर गेलीच आहे. गुजरातचेही बरे चाललेले नाही, हरयाणात गोंधळ आहे, मणिपुरात अंतर्कलह सुरूच आहेत. गोव्यात कोरोना शिखरावर पोहोचला आहे. बिहारमध्ये ‘विकास’ हा मुद्दा साफ खड्ड्यात गेल्याने मुंबईतील सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर राजकीय गुजराण सुरू झाली आहे. खरे तर यांच्यापेक्षा विरोधकांची सरकारे उत्तम चालली आहेत, पण त्यांना केंद्राची अजिबात मदत नाही की सहकार्याची भावना नाही. म्हणूनच राजस्थानात ‘ऑपरेशन कमळ’ फसले. हा राजकीय विकृतीचा पराभव असल्याचे आम्ही मानतो. ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’प्रमाणे ‘ऑपरेशन कमळ’ची दहशत निर्माण केलीच होती. ‘‘सो जा बच्चे, नही तो गब्बर आ जायेगा’’ या धर्तीवर विरोधी सरकारांनी सरळ गुडघे टेकावेत, नाहीतर ‘ऑपरेशन कमल हो जायेगा’ या भीतीचे सावट निर्माण करायचे.

मात्र राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘ऑपरेशन कमळ’चेच ऑपरेशन करून भाजपला धडा दिला. काही ऑपरेशन टेबलावरच फसतात. महाराष्ट्रातही पहाटेचे ऑपरेशन फसले. आता सप्टेंबर महिन्यातील ऑपरेशनची नवी तारीख भोंदू डॉक्टरांनी दिली आहे. राजस्थानमधले ऑपरेशन महिनाभर चालले व फसले. भाजपने आता तरी धडा घ्यावा. थोडे थांबायला काय हरकत आहे. थांबा आणि पुढे जा, वळणावर धोका आहेच!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर भाजपसमोर महाविकासआघाडीचा निभावही लागणार नाही”, चंद्रकांत पाटलांचं आव्हान

News Desk

पक्षासाठी आयुष्य वेचलेले सत्ते बाहेर तर राणें सारखे मंत्री कसे होतात ?

News Desk

“भाजप सरकारच्या काळात दंगली होत नाही,” बोंडेंचं मलिकांच्या आरोपाला प्रत्युत्तर

News Desk