HW News Marathi
महाराष्ट्र

मोदींनी आंदोलनजीवी म्हटल्यानंतर नितीन गडकरींचा ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण करताना देशात आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. मोदींनी आपण या पूर्वी श्रमजीवी, बुद्धिजीवी हे शब्द ऐकल्याचं म्हटलं होते. त्यानंतर आंदोलनजीवी नावाची जमात निर्माण झाली आहे. ही टोळी देशभरात सक्रिय असून या टोळीने उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका नरेंद्र मोदी केली. यानंतर राजकीय पक्षांसह सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया येत आहेत. नरेंद्र मोदींनी आंदोलनजीवी म्हणून डिवचल्यानंतर नितीन गडकरींचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या व्हिडीओ सोबतच भाजप नेत्यांचे आंदोलनातील बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत.

नितिन गडकरी काय म्हणाले त्या व्हायरल व्हिडीओमध्ये?

नितीन गडकरी यांचा काँग्रेस नेते डॉ.मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामध्ये नितीन गडकरींनी शांततापूर्ण आंदोलन करणं जनतेचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे.”पंतप्रधान जी गोष्ट सांगत आहेत ती लोकशाही विरोधी आहे, या देशात भ्रष्ट लोक आणि सरकारविरोधात आंदोलन करणं जनतेचा, विरोधकांचा, काम करणाऱ्यांचा अधिकार आहे. हा अधिकार आपल्याला काँग्रेसनं किंवा दिलेला नाही. तो अधिकार संविधानानं दिला आहे. मुलभूत अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असूनही शांततापूर्ण पद्धतीनं आंदोलन करु नये, असं वक्तव्य पंतप्रधान कसं म्हणू शकतात. हे योग्य आहे का याचं आत्मपरिक्षण पंतप्रधानांनी करावं”, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. नितीन गडकरींसोबत व्हिडीओमध्ये सध्याचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद देखील दिसत आहेत.

https://twitter.com/Naveen_congress/status/1359151264639160328?s=20

मोदींनी आंदोलनजीवी म्हटल्यानंतर विरोधकांनी घेतला समाचार

या व्हिडीओवर ‘ही पाहा, हीच ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेली नवीन ‘आंदोलनजीवी’ जमात’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच व्हिडीओवर पाच कावळ्यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. या व्हिडीओच्या सुरुवातीला पंतप्रधानांचं संसदेतील आजचं १३ सेंकदाचं भाषण दाखवण्यात आलं आहे. देशात आंदोलनजीवी नावाची नवी जमात आल्याचं मोदी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. त्यानंतर या व्हिडीओत भाजप आणि विश्व हिंदू परिषदेने आजवर घेतलेल्या आंदोलनाचे फोटो दाखवण्यात आले आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे बाईट्सही दाखवण्यात आले असून त्यात ते राज्य सरकारला आंदोलन करण्याचा इशारा देत असताना दाखवलं आहे. हे फोटो आणि बाईट्स दाखवताना फोटो, बाईट्स संपताच पार्श्वभागाला मोदींचा आंदोलनजीवी हा शब्द ऐकायला येतो. त्यानंतर खवचट हसण्याचा आवाज येत असून या व्हिडीओतून राष्ट्रवादीने भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवल्याचं दिसून येत आहे.

 

‘होय, आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जय जवान, जय किसान!’ आणि ‘गर्वसे कहो हम आंदोलनजीवी है. जय जवान, जय किसान’,असे २ ट्वीट संजय राऊत यांनी केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी दिल्लीच्या शेतकरी आंदोलनातील नेते राकेश टिकैत यांच्यासोबतचा फोटो पोस्ट आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा मुहूर्त ठरला

Gauri Tilekar

“लोकप्रतिनिधींना रस्त्यातच अडवा”, उदयनराजेंची मराठा बांधवांना चिथावणी!

News Desk

काय म्हणते ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर घेऊन उभी राहणारी तरुणी…

News Desk