HW News Marathi
Covid-19

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेटिंलेटरवर

नवी दिल्ली | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. काल (१० ऑगस्ट) त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कोरोनाचे उपचार देखील सुरुच होते. मुखर्जी यांच्या मेंदूमध्ये एक गाठ होती. त्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, प्रणव मुखर्जी हे २०१२ ते २०१७ या कालावधीत भारताचे राष्ट्रपती होते.

प्रणव मुखर्जी यांनी ट्विट केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, आपण एका दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला कोरोनाची लागण झाली असल्याचे समजले. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला क्वारंटाईन व्हावे, तसेच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील एकूण कोरोना मृत्यूपैकी ३४ टक्के महाराष्ट्रात!

News Desk

धक्कादायक ! बीडमध्ये कोरोना योद्ध्याला मिळाली नाही ॲम्बुलन्स, पॉझिटिव्ह असताना रात्रभर ड्युटी

News Desk

पालघर सामूहिक हत्याकांडानंतर दत्तात्रय शिंदे जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक

News Desk