HW News Marathi
महाराष्ट्र

नवी मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरातील एका कंटनेरमधून १९१ किलो हेरॉइन जप्त

नवी मुंबई | नवी मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरातील एका कंटनेरमधून १९१ किलो हेरॉइन आज (१० ऑगस्ट) जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉइनची किंमत १ हजार कोटी रुपये आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई युनिटने ही कारवाई केली. अलीकडच्या काळातील अंमली पदार्थ जप्तीची ही मोठी कारवाई आहे. आंतरराष्ट्री तस्करांची टोळी याच्याशी संबंधित असून अफगाणिस्तानातून हा माल आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

कंटेनरमधील माल मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना डीआरआयने मुंबईतून अटक केली. समुद्रमार्गे हे हेरॉइन पाठवण्यात आले होते. डीआरआय, न्हावा-शेवा आणि कस्टम असे तिघांनी मिळून हे ऑपरेशन केले. मुंबई मिररने हे वृत्त दिले. मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीमार्गे बेकायदरित्या अंमलीपदार्थ आणण्याचा प्रयत्न केला जातो. तिथून मग संपूर्ण देशात वितरण केले जाते. या प्रकरणी दोघांना न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी बांधले शिवबंधन

News Desk

धर्मा पाटलांच्या मुलाने मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

swarit

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Aprna