HW News Marathi
महाराष्ट्र

“…आणि कडक कणखर दादांच्यातील संवेदनशील कुटुंबप्रमुख बघितला”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची स्टाईल, त्यांचे व्यक्तिमत्व आक्रमक, करारी म्हणून सगळ्यांनाच ज्ञात आहे. परंतु अजित पवारांच्या कुटुंबातल्या माणसांवर किती जीव आहे, त्यांच्यात कुटुंबवत्सलपणा किती ठासून भरला आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. अजित पवार यांच्या बालपणापासून त्यांच्या घरात काम करणारे जालिंदर शेंडगे आजारी असल्याचं कळताच अजितदादांच्या जीवाची कश्या प्रकारे घालमेल झाली आणि तिथून पुढे वेगाने चक्र फिरवून त्यांना उपचारासाठी मदत करणाऱ्या अजित पवार यांच्यातला कुटुंबप्रमुख अजितदादांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांनी सगळ्यांसमोर आणला आहे.

काय म्हणाले सुनीलकुमार मुसळे?

“सुनीलकुमार मुसळे यांनी म्हटलंय, अजितदादा पवारसतत कामात व्यस्त असणारा माणूस.मीडिया दादांच्या या गोष्टींच्या नेहमी बातम्या करतो.दादांच्या कामाची स्टाईल,त्यांची निर्णय घेण्याची क्षमता,कामाची धडाडी यांची नेहमी चर्चा होते.दादांचे मित्र आणि दादांचे टीकाकार दादांच्या धडाडीची स्तुती करतात. मी गेली दोन दशक दादांच्यासोबत काम करतोय. दादांचा राजकीय पिंड मला जवळून बघता आलाय.पण दादांचा कुटूंबवत्सल स्वभाव त्याहून मला जवळून बघता आलाय.उपमुख्यमंत्री असणाऱ्या दादांची कुटूंबवत्सलता मला खूप भावली आहे. कुटूंबासाठी दादा किती संवेदनशील आहेत याचे अनेक अनुभव त्यांचा पीए म्हणून मला सांगता येतील.”

“दादांचे कुटुंब हे खूप व्याप्त आहे.त्यात चुलते, पत्नी, मुले भाऊ,पुतणे,असा मोठा परिवार आहेच पण दादांच्या कुटूंबात दादांच्या घरातील सर्व नोकर,त्यांची मुले, त्यांचे नातेवाईक असतात.दादा कितीही व्यस्त असले तरी ते आपला कुटुंबवत्सल स्वभाव सोडत नाहीत.त्यांचे वात्सल्य तेच राहते. जालिंदर शेंडगे हे अजित दादांच्या लहानपणापासून पवार कुटूंबाच्या सेवेत आहेत. दादा लहान असताना त्यांना सायकलने शाळेत पोहोचवण्याचे काम शेंडगे करत होते. दादा आमदार झाले, खासदार झाले, राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांचा तोच जिव्हाळा कायम राहिला.जालिंदर आणि त्यांचा ऋणानुबंध तोच राहिला.”

“अधूनमधून दादा त्यांची चौकशी करतात.गेले दोन दिवस दादा वेगवेगळ्या व्यापात आहेत. कामाचा धडाका सुरू आहे. याकाळात दादांना अजिबात वेळ नसतो.त्याचवेळी एका कार्यक्रमात दादांना निरोप येतो, “जालिंदर खूप आजारी आहे.”तो निरोप ऐकताच दादांच्यातील नेत्यांवर कुटुंबप्रमुख विजय मिळवतो. दादा तिथूनच फोनाफोनी सुरू करतात.’काहीही करा पण जालिंदरला बर करा.”दादा जिव्हाळ्याने सांगत राहतात.जालिंदर जोवर दवाखान्यात जात नाही तोवर स्वतः पाठपुरावा करत राहतात.”

“जालिंदरवर उपचार सुरू झाल्यावरच दादांच्या चेहऱ्यावरचा तणाव निवळतो. गेली काही वर्षे सोबत असल्याने मलाही समजत आता दादा तणावात नाहीत.या काळात तसच झालं.आणि कडक कणखर दादांच्यातील संवेदनशील कुटुंबप्रमुख बघितला”, असे मुसळे यांची सांगितले आहे. त्यामुळे आज अजित पवारांची आणखी एक संवेदनशील अशी वेगळी बाजू सगळ्यांसमोर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केल्याचा आरोप करत सरकारविरोधात भाजप करणार जेलभरो आंदोलन 

News Desk

दोन्ही भोसले आमने-सामने

Gauri Tilekar

पालघरचे भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचे निधन

swarit