HW News Marathi
देश / विदेश

न्यूज क्लिकच्या कार्यालयावर ईडीचा छापा

नवी दिल्ली ईडीने आज (९ फेब्रुवारी) सकाळी न्यूज क्लिक या न्यूज वेब पोर्टलच्या कार्यालयावर छापा मारला आहे. या छापेमारीत कार्यालयासोबत जे पत्रकार आहेत त्यांच्या घरावरही ईडीने धाड टाकली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील न्यूज क्लिकच्या सईदुलाजबच्या या कार्यालयावर छापा टाकला आहे. The Wire च्या वृत्तानुसार या पोर्टलचे मालक प्रबीर प्रकायस्था आणि संपादक प्रांजल यांच्या घरीही ईडीने छापेमारी केली आहे.

तर, The Quint च्या वृत्तानुसार ईडीने ही छापेमारी मनी लॉंड्रींग संदर्भात केली आहे. कंपनीला विदेशातून फर्जी कंपनीतून पैसे येत असल्याची शंका असून त्याचीच पडताळणी सुरु आहे.

दरम्यान, न्यूज क्लिकवर कार्यक्रम करणारे ज्येष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांनी ट्विट करत या छापेमारीची माहिती दिली आहे. अभिसार यांनी केलेल्या ट्विटनुसार सकाळी १० वाजताच्या दरम्यान शेअर होल्डर आणि दिग्दर्शकांच्या घरी ईडीने धाड टाकली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इदनंतर गळाभेट घेणे टाळा

News Desk

भाईगिरी नंतर डॅडी गांधीगिरीत अव्वल

News Desk

आंतरराष्ट्रीय वेबसाईट्सना जगभरात Error, ‘या’ साईट्स ओपनच होईनात…

News Desk