HW News Marathi
Covid-19

शरद पवारांनी घेतला सातारा, कोल्हापूरमधील कोरोनास्थितीचा आढावा

सातारा | कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड-१९ प्रादुर्भावाच्या सद्यपरिस्थितीचा आढावा व संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना या संबंधिची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (९ ऑगस्ट) घेतली आहे. दरम्यान सातारा आणि कोल्हापूर या जिल्हयांतील आरोग्यविषयक समस्यांवर सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आली.

गंभीर परिस्थितीत गरजू व गरीब बाधितांना विनाशुल्क तातडीचे उपचार मिळावेत या उद्देशाने रेमडेसिवीर या महागड्या इंजेक्शन्सची कुमकही दोन्ही जिल्हयाच्या आरोग्य यंत्रणांना याप्रसंगी देण्यात आली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, सातारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सातारचे खासदार श्रीनिवास पाटील दोन्ही जिल्ह्यांतील खासदार, तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून टाक्स फोर्स नियुक्त करा,आशिष शेलारांची मागणी

News Desk

“आता इंजेक्शन्स कुठेयत? मी कारवाईला घाबरत नाही”

News Desk

राष्ट्रपती शासन लागुकरण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांनो “महाराष्ट्र झोपला आहे” असे समजू नका !

News Desk