HW News Marathi
Covid-19

जरा लांबून बोल ना… अजित पवार मनसे नगरसेवकावर का भडकले?

पुणे | आमचे चार मंत्री पॉझिटिव्ह आले आहेत. लांबून बोलणं, फिजिकल डिस्टन्स ठेवण्यावरून मनसेचे गटनेते आणि नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. मात्र, एव्हढीच काळजी होती तर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवलाच कशाला, ऐकूणच घ्यायचं नव्हतं तर निमंत्रण दिलेच कशाला, असा सवाल आता नगरसेवक सचिन चिखले यांनी केला आहे. एवढंच नाही तर अजित पवारांच्या वर्तणुकीवरही नाराजी व्यक्त केली आहे.

काल (७ ऑगस्ट) पुण्यातील जंबो रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी अजित पवार गेले असता तिथे हा प्रकार घडला. याच दौऱ्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने महापालिकेतील सर्व पक्षाच्या गट नेत्यांनाही आमंत्रित केले होते. त्यानुसार “आपण प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची माहिती देण्यासाठी, कोरोनाबाधितांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याची माहिती देण्यासाठी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हेही उपस्थित होते. मात्र , अजित पवारांनी एकूण घेणं तर दूरच उलट एकेरी उल्लेख करत आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली” अशी नाराजी नगरसेवक सचिन चिखले यांनी अजित पवारांच्या वर्तवणुकीबद्दल व्यक्त केली आहे.

“अजित पवारांच्या नकळत हा प्रकार घडला. मास्क लावलेला असल्याने नेमकं कोण आहे, ते त्यांच्या लक्षात आलं नसावं. सोशल डिस्टसिंगबाबत त्यांनी दिलेल्या योग्य आहेत. मात्र, त्याचा विपर्यास करून गैरसमज करून घेऊ नये अशी विनंती संबधित सन्मानीय नगरसेवकास केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या मागण्या अजित पवारांशी प्रत्यक्ष भेटून ठेवणार आहोत”, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रुग्णाला खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यास BMC ची परवानगी आवश्यक!

Aprna

भारतात कोरोनाचा उद्रेक! सलग तिसऱ्या दिवशी ४ लाखांहून अधिक रुग्ण

News Desk

एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा उद्या निकाल | उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

News Desk