मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने आता एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. राज्यातील शाळा ‘गुगल क्लासरूम’च्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून या उपक्रमासाठी सरकारनने गुगलशी करारही केला आहे.
या प्रकल्पाचे काल (६ ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, गुगलचे भारतातील विक्री प्रमुख संजय गुप्ता यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना आता कोणत्याही ठिकाणावरून शिक्षण घेणे सोप्पे होणार आहे.
विद्यार्थ्यांशी संवाद साधण्या सोबत शिक्षकांना या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सराव घेणेही सोप्पे जाईल. तसेच प्रकल्प देऊन त्यांचे मुल्यमापन करणेही या प्रकल्पामुळे सुलभ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दीड लाख शिक्षकांनी या माध्यमाचा वापर करण्यासाठी नोंदणी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकल्पाबाबत आनंद व्यक्त केला आहे. “”गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान आहे. वर्क फ्रॉम होम’ मध्येही हातभार लावण्याचे गुगलला आवाहन केले”, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
"गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान!"
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे'वर्क फ्रॉम होम’ मध्येही हातभार लावण्याचे गुगलला केले आवाहनhttps://t.co/3EckYWLT2F
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 6, 2020
दरम्यान सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचं आमचे लक्ष्य आहे, असं मत वर्षा गायकवाड यांनी यावेळेस बोलताना व्यक्त केले आहे. त्यामुळे याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा आणि कितपत होईल हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.