HW News Marathi
महाराष्ट्र

सुशांत सिंहच्या आत्महत्येबद्दल कंगना राणावतचे आदित्य ठाकरेंसाठी काही प्रश्न

मुंबई | सुशांत सिंग राजपूत आत्महत्येविषयी नवीन गोष्टी समोर येत असून या प्रकरणाला राजकीय वळण आले आहे. काल (४ ऑगस्ट) या प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी बाजू मांडत हे गलिच्छ राजकारण सुरू असल्याचे मत व्यक्त केले होते. यावरून अभिनेत्री कंगना राणावतने आता आदित्य ठाकरेंना उत्तर तर दिलं आहेच आणि प्रश्न देखील विचारला आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सादर केलेल्या पत्रावर उत्तर देताना कंगनाने अनेक प्रश्नही विचारलेत. “इतरांवर गलिच्छ राजकारण करण्याचा आरोप करणाऱ्यांनी आधी पाहावे तुमच्या वडिलांनी मुख्यमंत्रीपद कसं मिळवलं, ती एक गलिच्छ राजकारणाची केस स्टडी होईल, बाकी सगळं विसरून जा आधी सुशांत सिंहच्या आत्महत्येबद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांची उत्तरं द्या”, असं म्हणत कंगनाने काही प्रश्न ट्विटरच्या माध्यमातून विचारलेत.

काय विचारले प्रश्न?

– रिया कुठे आहे?

– सुशांत सिंहच्या अनैसर्गिक मृत्यूबद्दल मुंबई पोलिसांनी अजून एफआयआर का दाखल केलेला नाही?

– फेब्रुवारी महिन्यात सुशांतच्या जीवाला धोका असल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या, मात्र मुंबई पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष का केलं?

– सुशांतच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड अजूनही का तपासण्यात आले नाहीत?

– तपास पथकाचं नेतृत्व करण्यासाठी आलेल्या आयपीएस विनय तिवारी यांना क्वारंटाईन का केलं?

– महाराष्ट्र सरकारला सीबीआयची का भीती वाटते?

– रिया आणि तिच्या कुटुंबियांनी सुशांतचे पैसे का लुबाडले?

या प्रश्नांची उत्तरे कंगनाने ट्विटरवरून मागितली आहेत. या सात प्रश्नांमुळे नक्कीच सुशांत आत्महत्या प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याची बाजू उघडपणे मांडणाऱ्यांमध्ये कंगनाने या प्रश्नांच्या माध्यमातून अनेक पैलूंना समोर आणले आहे. आता आदित्य ठाकरे या प्रश्नांची उत्तरे देणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1290666504233472000?s=19

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे”, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा!

News Desk

परळीत खदानीतील पाण्यात बुडून तीन भावंडांचा मृत्यू

News Desk

मुंबईतील इमारतींच्या दुरूस्ती व पुनर्विकासासाठी शासन सदैव प्रयत्नशील! – डॉ.जितेंद्र आव्हाड

Aprna