HW News Marathi
महाराष्ट्र

#SushantSinghRajput – सूत्रधार कोण हे आम्हाला माहितीये, संबंधितांना या कारस्थानाची मोठी किंमत मोजावी लागेल !

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण आले आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांनी आणि बिहार सरकारने केली होती. ती मान्य करण्यात आली आहे. त्यात आता काही जणांकडून यात मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव गोवण्याचा प्रकार केला आहे.यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

“आदित्य ठाकरे यांचा या सगळ्याशी काय संबंध. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्याने विरोधी पक्षातील काही जणांच्या पोटात दुखत आहे, अस्वस्थ आहेत. ज्यांना हे सरकार अजूनपर्यंत रुचलेलं नाही ते वैफल्यातून अशा प्रकारचे घाणेरडे आरोप करत आहेत. मला तर हे संपूर्ण महाराष्ट्राविरोधात कारस्थान असल्याची शंका आहे. यामागील सूत्रधार आम्हाला माहिती आहेत. त्या सगळ्यांना या कारस्थानाची मोठी किंमत मोजावी लागेल असं मी जाहीरपणे सांगतो,” असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ?

“सिनेसृष्टी म्हणजेच बॉलिवूड हे मुंबईचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू जितका दुर्दैवी आहे तितकाच धक्कादायकही… मुंबई पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करत आहेत. महाराष्ट्रातल्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक या प्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत” असंही आदित्य ठाकरेंनी म्हटले.

“मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून हे सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कधीही होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. या प्रश्नी मी संयमाने वागतोच आहे. अशा प्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कुणीही राहू नये.” असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईसह विदर्भातील अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश.. !

News Desk

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे होणार उद्घाटन

Aprna

भाजप कार्यकारणीची उद्या मुंबईत बैठक होणार

News Desk