HW News Marathi
देश / विदेश

हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन नगरसेवक अयोध्येत दाखल

उत्तर प्रदेश | ५ ऑगस्टला अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा दिमाखात पार पडणार आहे. यासाठी लोकं लांबून लांबून येत आहेत. अशातच मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष विक्रम प्रताप सिंग हे अयोध्येत दाखल झाले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन विक्रम प्रताप सिंग अयोध्येत पोहोचले आहेत. शरयू तीरावर ही माती ठेऊन त्यासमोर ४९२ दिवे लावणार आहेत.

“राममंदिराचं भूमिपूजन होत असल्याने बाळासाहेब ठाकरेंकचे स्वप्न साकार झाले आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील अयोध्येला तीन वेळेस येऊन गेले आहेत. त्यामुळे राम मंदिरात शिवसेनेचे योगदान खूप मोठे आहे. त्यासाठी शिवसेना आपल्या पद्धतीने मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद व्यक्त करणार आहे”, असे विक्रम प्रताप सिंग यांनी सांगितले आहे.

मीरा भाईंदर महापालिका नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष विक्रम प्रताप सिंह यांनी राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपालदास महाराज यांची त्यांच्या अयोध्येतील आश्रमात भेट घेतली. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दूत म्हणून विक्रम प्रताप सिंह अयोध्येत पोहोचले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तरीही वरिष्ठ नेत्यांना पराभवाची जबाबदारी स्वीकारावीशी वाटली नाही !

News Desk

भाजपश्रेष्ठींनी आदेश दिल्यानंतर अवघ्या २४ तासांत कमलनाथ सरकार पाडू !

News Desk

पहिल्या टप्याच्या मतमोजणीत काँग्रेसची आघाडी

News Desk