सांगली | ५ ॲागस्टला राममंदिर भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शरद पवार यांनी या सोहळ्याला जाणार नसल्याचे सांगितले आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही तशीचं भूमिका घेतली आहे. मात्र ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण नसेल तरीही त्यांनी अयोध्येला जावे’, असा सल्ला भिडे गुरुजी यांनी दिला आहे.
तसेच ‘कोरोनाला न घाबरता राम मंदिर भूमिपूजन सोहळा तमाम हिंदू समाजाने दिवाळी-दसऱ्या प्रमाणे साजरा करावा’ असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे. तसंच, ‘मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम लक्ष्मणच्या मूर्त्यांना मिश्या असाव्यात, अशी विनंतीही भिडे यांनी केली आहे.
‘500 वर्षांपासून अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न सुरू होता आणि आता तो साकारला जात आहे. ही देशातील तमाम हिंदू समाजासाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळे देशातील हिंदू समाजाने सध्या कोरोनाची परिस्थिती जरी असली तरी न घाबरता दिवाळी आणि दसऱ्या प्रमाणे हा सोहळा साजरा करावा आणि प्रत्येकाने यानिमिताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनही करावे’, असे आवाहनही संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.