HW News Marathi
Covid-19

सदाभाऊ खोत पिसाळल्यासारखे वागत आहेत, राजू शेट्टींनी सुनावले

मुंबई | “सदाभाऊ खोत हे नैराश्येतून भ्रमिष्टासारखे आरोप करत आहेत. आंदोलन फसल्यामुळेच ते पिसाळल्यासारखे वागत आहे”, म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर दिले आहे. राज्यभरात शनिवारी (१ ऑगस्ट) झालेल्या दूध दरवाढीच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत या दोघांमध्ये पुन्हा एकदा चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले.

“राजू शेट्टी आता काजू शेट्टी झाला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने हा भंपक माणूस भ्रमिष्ट झाला आहे. प्रत्येक गावात देवाच्या नावाने जसा एक वळू-रेडा सोडलेला असतो. तसा हा वळू रेडा आहे. त्याला आता शेतकऱ्यांनी सोडून दिलेला आहे. हा रेडा आता कोणत्याही पिकात अगदी दिसेल त्या पिकात आता तोंड घालू लागला आहे”, अशी अत्यंत टोकाची टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. यावेळी सदाभाऊ खोत यांची जीभ चांगलीच घसरल्याचे म्हटले जात आहे.

“सदाभाऊ खोत २ वेळा खासदार करायला त्या वळू रेड्याबरोबर होता. तेव्हा दोन्ही हातांनी हा सदाभाऊचा गजर करत होता. तेव्हा सदाभाऊ चालत होता. पण त्यांना सत्ता मिळाली नाही. केंद्रातही मंत्रिपद मिळाले नाही. मात्र, त्यांच्या सहकाऱ्याला मंत्रिपद मिळाले. त्यामुळे लगेच त्याच्या पोटात वाईचा गोळा उठला”, अशा कठोर शब्दात सदाभाऊ खोत यांनी टीका केली.

“राजू शेट्टी माझ्यावर अनेक आरोप करतात. त्यांच्याकडे जर माझ्याविरोधात पुरावे असतील तर त्यांनी खुशाल न्यायालयात जावे. आपल्या देशात न्यायव्यवस्था आहे. या सदाभाऊने त्यांच्यासारख्या ३००-४०० एकर जमिनी घेऊन ठेवलेल्या नाहीत. सरकारला आंदोलनाची भीती दाखवून जवळच्या सहकाऱ्यांना पेट्रोल पंप, संस्था काढून आम्ही सरकारचे पैसे नाही खाल्लेत”, अशी आरोपही यावेळी सदाभाऊ खोत यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर कोव्हॅक्सिन लस टोचून घेऊ नका, भारत बायोटेकने दिला गंभीर इशारा

News Desk

राज्यात आतापर्यंत तब्बल १३ लाखांहूनही अधिक रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य सरकारची नवी नियमावली जारी  

News Desk