HW News Marathi
Covid-19

हा अजित पवारांचा दांभिकपणा…दखल घ्या, कुचेष्टा करू नका ! चंद्रकांत पाटील संतापले

मुंबई । “मराठा समाजाचे असलेले आरक्षण घालवून समाजाला रस्त्यावर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आपणच आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवणे दांभिकपणा आहे”, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (२८ मे) केली आहे..

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल नाहीतर वेळ निघून जाईल, असे मी म्हटले होते. त्यावर अजित पवार यांनी उपरोधिकपणे स्वतःच रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली. असा दांभिकपणा करण्यापेक्षा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देणे किंवा आमच्या सरकारप्रमाणे वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण मिळवून देणे यावर भर द्यावा. तसेच पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आमच्या सरकारप्रमाणे मराठा समाजाला शिक्षण आणि रोजगारासाठी भरघोस सवलती द्याव्यात आणि त्यासाठी ३ हजार कोटींचे पॅकेज द्यावे. त्यांनी मराठा समाजाला दिलासा दिला नाही तर समाज त्यांना तसेही रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

अजित पवारांनी दखल घ्यावी, कुचेष्टा करू नये !

चंद्रकांत पाटील म्हणाले की, “तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमच्या भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. पण अजित पवार यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे आणि चुका केल्यामुळे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाले. परिणामी सर्वसामान्य मराठा माणसासाठी विकासाचा मार्ग बंद झाला आणि तो रस्त्यावर आला आहे. समाजातील सामान्य माणसाच्या या विषयात भावना तीव्र आहेत. अजित पवार यांनी याची दखल घ्यावी आणि अशी कुचेष्टा करू नये”, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नाशिक ऑक्सिजन दुर्घटना घडली, चौकशी समितीचा अहवाल सादर

News Desk

भाजप नेत्या पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण

Aprna

कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात येण्यास घातली बंदी 

News Desk