HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे तरी राणेंना सुखाने झोप लागेल, शरद पवारांचा खोटक टोला 

कोल्हापूर | ठाकरे सरकारने काही दिवसांपूर्वी भाजपच्या आणि काही इतर नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली होती. राज्य शासनाने सुरक्षा व्यवस्था कमी केली असली तरी केंद्राने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे, असे नारायण राणे यांनी म्हणत राज्य शासनाला हिणवले होते. त्यावर शरद पवार यांनी केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे तरी राणेंना सुखाने झोप लागेल,असा टोला आज (२२ जानेवारी) कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत लगावला आहे. यावेळी शरद पवारांनी अनेक विषयांवर भाष्य कले होते.

राजकीय नेते आणि त्यांना पुरवली जाणारी सुरक्षा हा नेहमीच वादाचा विषय बनत आहे. आता ही राज्य शासनाने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नारायण राणे, राज ठाकरे आदी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली आली आहे. यावरून वादाला तोंड फुटले आहे. याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, कायदा-सुव्यवस्था याचा नेमका विचार करून कोणाला किती सुरक्षा पुरवायची याचा निर्णय राज्य शासन घेत असते. त्यानुसार राज्य शासनाने निर्णय घेतला असताना केंद्र शासनाने त्यामध्ये हस्तक्षेप करून पुन्हा नव्याने सुरक्षा पुरवली आहे; ही पद्धत योग्य नव्हे, अशी टिप्पणीही त्यांनी केली. माझीही सुरक्षा व्यवस्था कमी केली होती पण त्यावर आपण काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राणेंना नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही’, भास्कर जाधवांचा इशारा

News Desk

‘विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सुरु करा’, आमदार प्रशांत परिचारकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत राज्यात १ कोटी १० लाख लाभार्थी! – अब्दुल सत्तार

News Desk