HW News Marathi
Covid-19

चिंताजनक ! मुंबईत २९ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण

मुंबई | मुंबईतील काही भागात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. मुंबईत २९ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मतीमंद मुलांचे वसतिगृह असलेल्या चिल्ड्रन अँड सोसायटी मानखुर्द येथील ही सर्व मुले असल्याची माहिती मिळत आहे.

मतीमंद मुलांपैकी २४ मुले व ५ मुली कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. सर्व मुलांना विविध आजार असल्याने त्यांना उपचारासाठी आणि संसर्ग वाढू नये यासाठी विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे.

दरम्यान, वस्तीगृहात बंदी असतानाही कोरोनाचा संसर्ग कसा झाला हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा शिरकाव झाला तरी कसा, याचा आता संबंधित यंत्रणेकडून शोध घेण्यात येत आहे. तसेच, या सर्व मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१८ वर्षावरील नागरिकांना मोफत लसीचं गिफ्ट मिळणार? अजित पवार म्हणतात…

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोना लस

News Desk

मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे ! मृत्यूदर ५.५ टक्क्य़ांवर पोहोचला 

News Desk