HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत सातत्याने कमी चाचण्यांमुळे मृत्यूसंख्येत होणारी वाढ चिंताजनक !

मुंबई | “मुंबईत सातत्याने कमी चाचण्यांमुळे मृत्यूदर वाढतो आहे. शिवाय, संसर्गाचे प्रमाणसुद्धा चिंताजनक आहे. त्यामुळे तातडीने चाचण्यांच्या संख्येवरील मर्यादा हटवून मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याची गरज आहे”, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. “पुण्यापेक्षा कितीतरी अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईतील चाचण्या अतिशय कमी होत आहेत”, असेही फडणवीसांनी निदर्शनास आणले आहे.

देवेंद्र फडणवीस आपल्या पत्रात म्हणतात कि,”वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा मुंबईतील चाचण्यांची संख्या कमीच आहे, याकडे लक्ष वेधताना देवेंद्र फडणवीस म्हणतात की, २३ जुलै २०२० पर्यंत मुंबईत ४,६२,२२१ चाचण्या झाल्या आहेत, तर २३ जुलैपर्यंत पुण्यात ३,५४,७२९ चाचण्या झाल्या आहेत. अगदी १७ ते २३ जुलै या आठवड्याचा विचार केला तर ४१,३७६ चाचण्या मुंबईत झाल्या आहेत. तर याच कालावधीतील पुण्याच्या चाचण्या ८५,१३९ इतक्या आहेत. याचाच अर्थ मुंबईपेक्षा दुप्पट चाचण्या पुण्यात झाल्या आहेत.”

मृत्यूदर आटोक्यात न येण्याचे एकमात्र कारण म्हणजे कमी प्रमाणात होणाऱ्या चाचण्या !

मुंबईत कमी चाचण्या करणे हे मुंबईकरांच्या जिवाशी खेळण्यासारखे होईल. याचा थेट परिणाम हा मृत्यूदरावर होतो आहे. पुण्याचा मृत्यूदर २.३९ टक्के असून, मुंबईचा मृत्यूदर हा ५.६० टक्के झाला आहे. तर महाराष्ट्राचा मृत्यूदर हा ३.६८ टक्के असून मुंबईचा मृत्यूदर आटोक्यात न येण्याचे एकमात्र कारण हे कमी संख्येने होणार्‍या चाचण्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरादेवीत समर्थकांची तुफान गर्दी

News Desk

कोस्टल रोडचे काम करताना वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घेण्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे निर्देश

Aprna

पवारांची चप्पल उचलणारे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत आहेत – निलेश राणे

News Desk