HW News Marathi
महाराष्ट्र

माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा – उद्धव ठाकरे

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि भाजपावर घणाघात केल्याचे या टिझरमधून पाहायला मिळत आहे.

राष्ट्रीय राजकारणाकडे तुम्ही कसे पाहता असा प्रश्न विचारला असता त्यावर आता तुम्हाला चीन नको आहे मात्र कालांतराने हिंदी चीनी भाई भाई होणार नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे ते असेही म्हणाले की,वयाच्या साठीला मला मुख्यमंत्री पद मिळालं असलं तरी यासाठीच केला होता हट्टाहास असं नाही, हा योगायोग आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आमचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, हे सरकार लवकरच पडेल असा दावा केला जातो यावर उद्धव ठाकरे म्हणाले की माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडा , असे आवाहन त्यांनी विरोधी पक्षाला केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला शिवसेनामय करायची आहे, सेनेला आत्मनिर्भर करायचे आहे, काय सांगाल? यावर उद्धव ठाकरे यांनी अतिशय शांतपणे म्हटले की, मी आजही माझी सही आपला नम्र अशीच करतो यावरून त्यांचा साधेपणा आणि कणखरपणा स्पष्ट दिसून येतो आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छगन भुजबळ यांची १०० कोटींची मालमत्ता जप्त?

News Desk

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आक्रमक, भाजपवर दबाव

News Desk

गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्ताने पंकजा मुंडेंचा ‘सेवा संदेश’; व्हिडिओ प्रचंड व्हायरल

News Desk