HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीत शेकडो कार्यकर्त्यांची घरवापासी सूरू!

मीरा भाईंदर | नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे एका पक्षातून दुसऱ्यात पक्षात पक्षांतर सुरुच आहे. मीरा भाईंदर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसीचं सत्र सुरु झालं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेत मीरा भाईंदरच्या माजी महापौर, माजी विरोधीपक्ष नेते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पुन्हा घड्याळ बांधले. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस अशा तिन्ही प्रमुख पक्षातील नेते-कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच पुनर्प्रवेश केला.

राष्ट्रवादी सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्या नेत्यांची घरवापसी सुरु झाली आहे. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. यामध्ये मीरा भाईंदर महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते डॉ. असिफ शेख, माजी महापौर निर्मला सावळे आणि रमजान खत्री यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे . गेल्या वेळी मीरा भाईंदर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला राम राम करुन भाजप, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माझे वीजबिल मलाच झटका”, वीजबिल वसुलीच्या आदेशावरुन भाजपची आक्रमक भूमिका

News Desk

आज बाळासाहेब असते, तर… क्रांती रेडकरचं मुख्यमंत्री ठाकरेंना भावनिक पत्र

News Desk

कीटकनाशक व्यवस्थापन कायदा -२०१७ तात्काळ अस्तित्वात आणा -महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनची मागणी

News Desk