HW News Marathi
महाराष्ट्र

“मी स्वत: निराशावादी नाही आणि मी कोणालाही निराशावादी होऊ देणार नाही” – उद्धव ठाकरे

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामना मधून सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. यात त्यांनी अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा केल्या आहेत. कोरोनाचं आव्हान, राज्याची आर्थिक स्थिती आणि महाविकास आघाडीस सरकारचीएकूण कार्यपद्धती या संबंधित प्रश्नांची सोडवणूक खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ संजय राऊत आपल्या ट्विट वरून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. आता संजय राऊत यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपण निराशावादी नसल्याचे स्पष्ट वक्तव्य केले आहे.

‘महाविकास आघाडी काय म्हणतेय? मी निराशावादी नाही.., मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांची Unlocked मुलाखत..’, असं कॅप्शन देत राऊतांनी या मुलाखतीची झलक सर्वांच्या भेटीला आणली आहे.’मी स्वत: निराशावादी नाही आणि मी कोणालाही निराशावादी होऊ देणार नाही’, असे मुख्यमंत्री म्हणताना दिसत आहेत. धोरणांची अनिश्चितता असल्यास गुंतवणूक येणार नाही, या वक्तव्यावरुन त्यांनी राज्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनेही काही महत्त्वपूर्ण माहितीपर मुद्दे मांडले असे दिसत आहे.

महाविकासआघाडी सत्तेत आली तेव्हापासून किंबहुना त्या आधीपासून राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे म्हणजे संयम अशीच एक प्रतिमा पाहायला मिळाली. त्याविषयीही राऊतांनी विचारताच, तुम्हाला काय हवं ते ठरवा ‘संयम’ की ‘यम’? असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांची ही मुलाखत सगळ्यांचे लक्ष नक्कीच वेधनारी ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठी भाषा दिनानिमित्त रमेश देव, लता मंगेशकरांना अनोखी स्वरवंदना

News Desk

नवनिर्वाचित आमदारांना राष्ट्रपती राजवटीची धमकी, राऊतांचा भाजपवर आरोप

News Desk

‘डॉ.कोल्हेंनी देशातील ऑर्डनन्स फॅक्टरींचे खासगीकरण करु नका’, थेट पंतप्रधान मोदींना केली विनंती…!

News Desk