HW News Marathi
Covid-19

मुंबईत दादरमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे कोरोना रुग्ण संख्या

मुंबई | मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या काही भागात आटोक्यात आली आहे तर काही भागात वाढत चालली आहे. मुंबईतील कोरोनाचे हॉट स्पॉट झालेल्या धारावीत संख्या कमी झाली. आज (२२ जुलै) कोरोनाचे केवळ ५ रूग्ण वाढले तर दादरमध्ये ५८ रूग्ण वाढले आहेत.तर माहीम मध्ये १३ रूग्ण वाढल्याचे समोर आले आहे. धारावीत एकूण रूग्णसंख्या २५०७ तर दादरमध्ये एकूण रूग्णसंख्या १५०२ झाली. मुंबईतील रूग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता १.१७ टक्के असा झाला आहे.

२४ विभागांपैकी २१ विभागात हा सरासरी दर १.५ टक्क्यांच्या खाली तर १४ विभागात हा सरासरी दर १.१ टक्क्यांपेक्षा कमी आहे. या १४ पैकी ११ विभागात १ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. तसेच रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५९ दिवसावर आल्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात ३७,७२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. सध्या देशातील एकूण रुग्णसंख्या ११,९१,९१५ पर्यंत पोहोचली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन्ही व्हॅक्सीन सुरक्षित;आरोग्य कर्मचार्‍यांनी व्हॅक्सीनेशन कार्यक्रमात सहभागी व्हावे – राजेश टोपे

News Desk

राज्यात हाॅटेल्स आणि लाॅज लवकरचं सुरू करण्याचा विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Arati More

राज्यातील महाविद्यालयाच्या परीक्षांबद्दलचा निर्णय उद्या जाहीर होणार

News Desk