मुंबई | राज्यात कोरोनाच्या या संकट काळात पोलीस जीवाची बाजी लावत रात्रंदिवस आपली कामगिरी चोख बजावत आहेत. सध्या लोकांनी विनाकारण बाहेर फिरू नये यासाठी पोलिस कारवाई देखील करत आहेत. मात्र, काही पोलीस बांधव देखील कोरोनाच्या आजारापासून लढत आहेत. काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली त्यातून ते बरे हौने घरी गेले तर काही पोलिसांना जीव देखील गमवावा लागला.
या सर्व काळात बॉलिवुड अभिनेता सोनू सूद याने मजुरांसाठी स्वखर्चाने त्यांना आपल्या राज्यात पाठवले. पुन्हा एकदा सोन सूद याने निःस्वारथ मदतीचा हात पोलिसांना दिला आहे. सोनू सूद याने २५,००० फेस शिल्ड पोलिसांना दिले आहेत. याबद्दल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोनू सुद याचे आभार मानले आहेत.
आमच्या पोलिस कर्मचार्यांना 25,000 फेस शिल्ड देऊन दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मी @SonuSood जी आपले आभार मानतो. pic.twitter.com/jG1dKIC5dP
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 16, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.