HW News Marathi
महाराष्ट्र

इंदापूर तालुक्यात एका महिलेने राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंचीच पकडली कॉलर

बारामती | इंदापूर तालुक्यातील रेडणी गावचा वाद थेट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापर्यंत गेला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात महिलेने थेट मंत्री दत्तात्रय भरणे यांची कॉलर पकडली असल्याचं समोर आलं आहे. दीड महिन्यांपूर्वी संभाजी चव्हाण यांच्याविरुद्ध प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे ३९४ अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संभाजी चव्हाण यांनी प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. म्हणून काल (११ जानेवारी) प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे कुटुंबातील लोक दत्तात्रय भरणे यांच्या घराबाहेर उपोषणाला बसले होते. प्रफुल्ल चव्हाण हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. प्रफुल्ल चव्हाण हा दत्तात्रय भरणे यांचा निकटवर्तीय आहेत.

 

प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी ५ लाख रुपये खंडणी मागितली होती. ती न दिल्याने गुन्हा दाखल केल्याचा आरोप प्रफुल्लची आई शोभा चव्हाण यांनी केला आहे. शोभा चव्हाण या रेडणी गावच्या माजी सरपंच आहेत. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या निलंबनाची कारवाई व्हावी या मागणीसाठी प्रफुल्लची आई शोभा चव्हाण या दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर आमरण उपोषणाला बसल्या होत्या. त्यावेळी यांनी थेट दत्तात्रय भरणे यांची कॉलर पकडत जाब मगितल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. काल दुपारीच हे उपोषण मागे घेण्यात आलं होतं

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिस रकमेत पाचपट वाढ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

म्हणे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर ते मुंबई स्वतः गाडी चालवली, उद्या ते गाडी पण धुतील मग काय करू?

News Desk

मुंबईसह राज्यभरात जोरदार पाऊस

News Desk