HW News Marathi
देश / विदेश

आज मुख्यमंत्र्यांचा भंडारा दौरा, ‘त्या’ रुग्णालयाच्या पाहणीसह पालकांनाही देणार धीर

मुंबई । संपूर्ण राज्याला सुन्न करणारी घटना शुक्रवारी (८ जानेवारी) मध्यरात्री भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता वार्डला अचानक आग लागली. या आगीत १७ नवजात बालकांपैकी तब्बल १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील आज (१० जानेवारी) या दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाच्या पाहणीसाठी जाणार आहेत. दरम्यान,

राज्य सरकारकडून यापूर्वी या मृत बालकांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री या दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाची पाहणी करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा भंडारा दौरा

* आज सकाळी १० वाजून १० मिनिटांनी मुख्यमंत्री वर्षा निवासस्थान येथून सांताक्रूझ विमानतळाकडे रवाना होतील

* सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री विमानाने नागपूरकडे रवाना होतील

* दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी मुख्यमंत्री नागपूर विमानतळावर पोहोचतील

* दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शहापूरकडे निघतील

* दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी मुख्यमंत्री मौजा शहापूरला पोहोचतील

* दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी मुख्यमंत्री भंडारा येथे पोहोचून या दुर्घटनेत मृत पावलेल्या नवजात बालकांच्या भोजापूर येथील पालकांची भेट घेतील

* दुपारी १ वाजून २० मिनिटांनी मुख्यमंत्री भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचतील, तिथे ते पालकांची भेट घेतील आणि घटनास्थळाचं निरिक्षण करतील

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदापूर तालुक्यातील रुई येथे विमान कोसळले

News Desk

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आयसीयूमध्ये दाखल, होणाऱ्या पत्नीमध्येही कोरोना सदृश्य लक्षणे

News Desk

देशातील तरूण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो ! | नाना पटोले

News Desk