HW News Marathi
महाराष्ट्र

RSS चे हेडक्वार्टर असलेल्या नागपुरातही कोरोनाचा हाहाकार का? राजू शेट्टींचा चंद्रकांत पाटील यांना सवाल

कोल्हापूर | राज्यात सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण मुंबईतील धारावीत आढळले होते. मात्र, धारावीत ज्या पद्धतीने कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यास सरकारला यश आले त्याचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही कौतुक केले. दरम्यान, राजकीय वर्तुळात यावर टीका करण्यास सुरुवात झाली. विरोधी पक्ष नेत्यांकडून धारावीत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या कामगिरीमुळे संख्या कमी झाली असा दावा केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धारावी वर केलेल्या टीकेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर देत प्रश्नही उपस्थित केले आहेत.

राजू शेट्टी म्हणाले, “धारावीत कोरोनाचा हाहाकार माजला होता, कोरोनामुळे किड्या मुंग्याप्रमाणे लोकं मरत होती, त्यावेळी आरएसएसचे कार्यकर्ते मदत आणि बचाव कार्यात आघाडीवर आहेत, जीव धोक्यात घालून काम करत आहेत, असे एकही वृत्त वाचनात, पाहण्यात आले नाही. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने जेव्हा सांगितले धारावीची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली, त्यावेळी अनेक जण श्रेय घेण्यासाठी पुढे आले, कोल्हापुरात ते बोलत होते.

माझ्या मनात एक छोटीशी शंका आहे, RSS चे हेडक्वार्टर असलेल्या नागपुरातही कोरोनाचा हाहाकार आहे, तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही हे मला माहिती नाही, कारण मी तरी कोल्हापूरच्या बाहेर गेलेलो नाही. इचलकरंजीत कोरोनाचा हाहाकार आहे, अनेक शहरात आहे. त्यामुळे संघस्वेयंसेवकांनी तिथे जावे, त्यांनी जीव धोक्यात घालून संपूर्ण महाराष्ट्र कोरोना मुक्तीचं काम करावे, संपूर्ण महाराष्ट्र त्यांना धन्यवाद देईल.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

धारावीत झालेल्या कोरोना नियंत्रणाचे सगळे श्रेय सरकारने घेण्याची गरज नाही, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला लक्ष्य केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रीनिंग केल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.

“धारावीत सरकारने चांगलं काम केलं तर त्याचं कौतुकच आहे. मात्र, धारावीतील परिणाम सरकारने काम केल्याने झालं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जीव धोक्यात घालून स्क्रिनिंग केले. प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक सदस्याची तापमान, ऑक्सिजन, सॅच्युरेशन तपासणी केली. जे संशयास्पद वाटले ते महानगरपालिकेला सांगितले. त्यांनी हे काम नगरपालिकेच्या मदतीनेच केलं. पण हे सर्व श्रेय सरकारचं बनण्याचे कारण नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्ष प्रवेशानंतर कळलं की ते शिवसेनेचे नगरसेवक होते…

News Desk

बीड जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले!

News Desk

पुण्यातील शिवाजीराव भोसले बँकेचा रिझर्व्ह बँकेने परवाना केला रद्द

News Desk