HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या जागी विक्रम कुमार नवे पालिका आयुक्त

पुणे | पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची साखर आयुक्त पदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी पीएमआरडीएचे विक्रम कुमार यांची आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. तर पुणे विभागीय आयुक्त म्हणून सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अवघ्या ६ महिन्यांमध्ये शेखर गायकवाड यांची पुणे महापालिकेच्या आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली आहे. शेखर गायकवाड व्यतिरिक्त आणखी 4 आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

कुठे कुणाच्या बदल्या?

– सौरभ राव (२००३ बॅचचे आएएस) यांची साखर आयुक्तालयातून पुण्याच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

– शेखर गायकवाड (२००३ बॅचचे आएएस) यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदावरुन पुण्याच्या साखर आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

– विक्रम कुमार (२००४ बॅचचे आएएस) यांची पीएमआरडीएच्या सीईओपदावरुन पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

– पुण्यातील कृषी विभागाचे आयुक्त सुहास दिवासे (२००९ बॅचचे आएएस) यांची पीएमआरडीएच्या सीईओपदी नियुक्त झाली आहे.

– जितेंद्र दुडी (२०१६ बॅचचे आएएस) यांची सांगली जिल्हापरिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास शाळांच्या मान्यता रद्द करु, वर्षा गायकवाडांचा इशारा

News Desk

‘पुजा चव्हाण’ची आत्महत्या की घातपात ?, एका मंत्र्याचा संबंध असल्याच्या रंगल्या चर्चा

News Desk

मुख्यमंत्र्यांनी आपल्याच हातात स्टेअरिंग आहे असं म्हणू द्या, पण अजितदादांनी ट्विट करुन सगळं सांगितलं – विनायक मेटे

News Desk