HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आणि राहतील, कॅलेंडच्या ‘त्या’ टीकेवर राऊतांचे उत्तर 

मुंबई | शिवसेनेच्या शिवशाही या उर्दू कॅलेंडरमध्ये हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उल्लेख ‘शिवाजी जयंती’ असा केल्याने भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र उगारले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आणि राहतील. लोकांच्या हृदयात त्यांचं स्थान हिंदूहृदयसम्राट असंच आहे. ते आजही हिंदूहृदयसम्राट म्हणून ओळखले जात असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.कोणताही राजकीय प्रक्ष असा प्रश्न उचलतो त्यावरून बाळासाहेब ठाकरे यांचं स्थान कमी होत नसल्याचं म्हणत राऊतांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेनेच्या उर्दू कॅलेंडरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उल्लेख ‘शिवाजी जयंती’ असा केल्याने, भाजपने हल्लाबोल केला आहे. “शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून वैचारिक सुंता करून घ्यावी तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही”, असा हल्लाबोल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यावर्षी बारावीचे सगळेच विद्यार्थी होणार पास! अंतर्गत मूल्यमापनाविषयी लवकरच होणार निर्णय

News Desk

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी कालवश

News Desk

भाजप नेत्यांना केदारनाथला जाऊन डोकं थंड करायची गरज; संजय राऊतांचा टोला

Aprna