HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात २४ ते ४८ तासात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई | गेल्या चोवीस तासांत मुंबई आणि कोकण विभागात पावसाने चांगला जोर धरला होता. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, आज पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तर अधूनमधून सरी कोसळत आहेत. दक्षिण कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

तर पुढील २४ ते ४८ तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हा पाऊस प्रामुख्याने कोकण भागात पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत आज दुपारी समुद्राला उधाण येण्याची शक्यता आहे. तसेच समुद्रात उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने समुद्र किनारी कोणीही जाऊ नये, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

गेल्या २४ तासांत महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्यासह चांगला पाऊस झाला. दरम्यान, पुढील २४ ते ४८ तासात पुन्हा कोकण किणारपट्टीवर जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता कुलाबा येथील प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तासगावचा रथोत्सव होणार उत्साहात साजरा

News Desk

महाराष्ट्र ATSला धक्का! मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास NIAकडे द्या, ठाणे सत्र न्यायालयाचे ATSला निर्देश

News Desk

“उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही”, फडणवीसांचा राऊतांना टोमणा

News Desk