HW News Marathi
देश / विदेश

Covaxinच्या मानवी चाचणीसाठी या व्यक्तीची केली निवड

नवी दिल्ली | कोरोना विरुद्ध लढण्यासाठी देशात लस तयार केली जात आहे. पुढील आठवड्यात या नव्या लसीची क्लिनिकल चाचणी होणार आहे. महत्वाचे म्हणजे ज्या व्यक्तीला ही पहिली लस दिली जाणार आहे, त्या व्यक्तीची निवड देखील करण्यात आली आहे.

मानवी चाचणी करण्यासाठी चिरंजीत धीबरचं नाव पुढे आले आहे. चिरंजीत धीबर हे एक शिक्षक आहेत. पुढील आठवड्यात त्यांच्यावर क्लिनिकल ट्रायल होणार आहे, त्यासाठी त्यांना आयसीएमआरच्या भुवनेश्वर केंद्राला जावे लागेल.

चिरंजीत धीबर यांनी आपल्या फेसबूकवर या विषयी माहिती देताना म्हटलं आहे, संघाच्या प्रेरणेमुळे मी कोरोना व्हायरससाठी क्लिनिकल ट्रायलसाठी, माझं शरीर देशाला दान केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार चिरंजीत धीबर यांनी एप्रिल महिन्यातच क्लिनिकल ट्रायल करण्यासाठी अर्ज दिला होता.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार चिरंजीत धीवर हे बंगालच्या दुर्गापूरमध्ये शिक्षक आहेत. आरएसएसच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या महासंघाच्या कार्यकारिणीत सदस्य आहेत.

आपल्या देशाची औषध निर्मिती करणारी कंपनी भारत बायोटेक ने आयसीएमआरसोबत मिळून कोरोना व्हायरसची लस बनवली आहे. या लसीची माणसांवर चाचणी या महिन्यात होणार आहे, देशातील १२ केंद्रांवर या लसीची क्लिनिकल ट्रायल होणार आहे.

सरकारकडून १५ ऑगस्टपर्यंत ही लस लॉन्च करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण ही लस भारतात कधी लॉन्च केली जाईल, सर्वांसाठी कधी उपलब्ध होईल याला किती उशीर होईल किंवा लवकर येईल, यावर वेगवेगळी मते आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काही जणांना असं वाटतं जे बोलत होते पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. बस मग तिकडेच!

News Desk

सुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

News Desk

मुख्यमंत्र्यांना धमकावणारा आरोपी इसम गजाआड, मुंबई ATSची कारवाई

News Desk